दिभणा येथे फुले दाम्पत्य स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न

0
382

लोकवृत्त न्यूज रत्नाकर जेगठें
गडचिरोली,10 जानेवारी : येथून जवळच असलेल्या दिभना माल येथे माळी समाज संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सव तथा फुले दाम्पत्य स्मारक लोकार्पण सोहळा ०९ जानेवारी रोजी थाटात संपन्न झाला. दरम्यान या सोहळ्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारी ला सप्तखंजेरी निर्माते राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोकार्पण सोहळ्याला माजी भाजप नेते विलास देशमुखे, प्रवीण पेरबुवार, काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान, मा.नेताजी गावतुरे, विश्वजीत कोवासे, प्रा. संजय मंगर, अँड. प्रशांत सोनुले, शिवसेना (उबाठा) चे अरविंदभाऊ कात्रटवार, डॉ.अभिलाषा गावतुरे ग्रामपंचायत सर्व सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष तथा सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन डिमराज गुरनुले, आभार मुन्ना जेंगठे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here