हनीट्रैप प्रकरणी आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी

0
142

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 30 जानेवारी:- गडचिरोली जिल्ह्यातील एका अभियंत्याला हनीट्रॅपमध्ये फसवून 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना गडचिरोलीतील एलसीबीच्या पथकाने नागपुरात सापळा रचून सोमवारी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सात दिवस (5 फेब्रुवारीपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींमध्ये रविकांत कांबळे, पोलिस कर्मचारी सुशील गवई, रोहित अहिर आणि ईशानी नावाच्या महिलेचा समावेश आहे. संबंधित चारही आरोपींनी गडचिरोलीतील अभियंत्याला हनीट्रैप करून त्याच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यासाठी आरोपी अभियंत्याला सतत फोन करून धमक्या देत होते. या प्रकाराला कंटाळून अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य समजून जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपुरात पाठवले. पथकाने नागपूर एलसीबीच्या मदतीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सर्व आरोपींना गडचिरोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. येथे आरोपींना अटक करण्यात आली. मंगळवारी सर्व आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरुण फेगडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here