Home Breaking News आत्मसमर्पिताची नक्षलवाद्यांनी गोळी झाडून केली हत्या

आत्मसमर्पिताची नक्षलवाद्यांनी गोळी झाडून केली हत्या

704

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 26 जुलै:- नक्षलवाद्यांनी गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, ता. भामरागड असे त्याचे नाव आहे.
जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे सन 2007 पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. माओवादयांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे 07 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य माओवादयांचा हिंसेचा खोटा आणि विनाशकारी मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते.
काल दि. 25 जुलै रोजी ते दिनांक 26 जुलै 2024 चे मध्यरात्री माओवादयांनी जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली.
सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे

Don`t copy text!