गडचिरोली: उध्दव ठाकरे गटातील युवासेना जिल्हाप्रमुख भारसागडे व त्यांचे सहकारी शिंदे गटात प्रवेश

0
307

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 9 नोव्हेंबर: गडचिरोली येथील उद्धव ठाकरे गटातील युवासेना जिल्हाप्रमुजिल्ह्यातीलख दिपक भाऊ भारसागडे व त्यांचे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांना जाहीर पाठिंबा दर्शवत बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच गडचिरोली नागपूर,नागपूर-ग्रामीण,रामटेक, चंद्रपूर,भंडारा येथील युवासेना जिल्हाप्रमुख, आणि तेथील युवा कार्यकर्त्यांनी देखील आज राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर करत डॉ मा. खासदार श्रीकांत साहेब यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये अल्पावधीतच राज्यातील कष्टकरी, शेतकरी, हिला, युवा, ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांना राज्यातील प्रत्येक शहर, जिल्हा आणि तालुक्यांतून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी संबोधित करताना सांगून सर्वांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात स्वागत करत पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here