Home Breaking News काढोली येथील युवकाचा नदी मध्ये बुडून मृत्यू

काढोली येथील युवकाचा नदी मध्ये बुडून मृत्यू

719

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा ता.१३ ऑगस्ट:-कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील पाच मित्र आंघोळ करायला गावालगत असलेल्या सती नदीच्या घाटावर विशाल ताराचंद सहारे २० अमन लक्ष्मण निंबेकर २० प्रणय ऋषी सोनुले वय २० देवानंद मारुती चौधरी १९ प्रज्योत वामन सहिरे वय १४ वर्षे सर्व कढोली येथील रहिवासी असून हे आंघोळ करण्याकरिता गेले असता विशाल ताराचंद सहारे याला नदीत असलेल्या खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना अंदाजे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी सांगितली नंतर तिथे बघ यांची गर्दी वाढली व कढोली येथील संतोष मानकर सुरेश मानकर निखिल मानकर गंगाधर कोल्हे व गावकरी यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली असता घटनास्थळापासून अवघे दहा मीटर अंतरावर प्रेत मिळाले असून शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे हलविण्यात आले असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत

Don`t copy text!