चंद्रपुर : घरफोड्याच्या आवळल्या मुसक्यांं

208

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकवृत्त न्यूज
चंद्रपुर : घरफोडी प्रकरणात पाणाऱ्या आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळत त्यांच्याकडून सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकुण ३ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ३ फेब्रुवारी २०२५ रोजी केली. राकेश शुब्रहमण्यम सानिपती (वय-३४), धंदा-मजुरी, रा. तेलगु शाळेजवळ, रयतवारी कॉलरी, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, विश्वजीत बिमल सिकदर (वय-३२) धंदा-मजुरी, रा. बंगाली कॉम्प, पाण्याचे टाकीजवळ, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, दिपक राजु भोले, (वय-२१) धंदा-मजुरी, रा. शांतीनगर, बंगाली कॅम्प, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर असे आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोउपनि विनोद भुरले व पोलीस स्टाफ अरो पोलीस स्टेशन, रामनगर ह‌द्दीत पेट्रोलीग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, तिन इसम हे घरफोडी केली असुन संशईतरित्या रयतवारी कॉलरी, चंद्रपुर येथे फिरत आहे. त्यानुसार आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी घरफोड्या करून चोरी केलेले सोन्याचे दागीने हे सराफा सोनार नामे मनोज पवार, रा. सराफा लाईन, चंद्रपुर यास विक्री केले असे सांगितले. सराफा दुकानदार यांचेकडुन व इतर आरोपीकडुन सोन्याचे व चांदीचे दागीने असा एकुण ३ लाख ७१ हजर ३०० रुपयांचा माल जप्त केला. सदर आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापुर, चंद्रपुर शहर येथे चोरी, घरफोडी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून आरोपीताना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्यात पोउपनि विनोद भुरले, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि, संतोष निंभोरकर, पोहवा. सतिश अवथरे, नापोशि संतोच येलपुलवार,, पोशि गोपीनाथ नरोटे, पोशि नितीन रायपुरे, पोशि गोपाल आतकुलवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.