जि.प. उच्च प्राथमिक शाळा जयरामपूर येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार

117

जि.प. उच्च प्राथमिक शाळा जयरामपूर येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थीनीचा सत्कार
लोकवृत्त न्यूज
कोनसरी, गडचिरोली :- जि.प. उच्च प्राथमिक शाळा, जयरामपूर येथे शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेत घालवलेले आठवणीचे क्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित शिक्षकांनीही त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात शाळेची विद्यार्थीनी कु. तनवी घनश्याम मडावी हिची जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख वेणुगोपाल बाबूराव दासरवार यांच्या हस्ते तिला शाल, पुष्पगुच्छ व रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक हनुमंत मनोहर देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शाळेच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणात उत्तम प्रगती करून पुढे जावे, असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.