“मूलबाळ नाही म्हणून पिस्तूल रोखलं ” ; गडचिरोलीच्या तहसीलदाराच्या अटकेने खळबळ
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १७ एप्रिल – मूलबाळ होत नाही या कारणावरून पत्नीवर शारीरिक व मानसिक अत्याचार करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात कार्यरत तहसीलदार अविनाश शेंबटवाड (३४) यांना नांदेड पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून सध्या ते धानोरा तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर सासरी तिला वारंवार मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. कर्तव्यावर असताना देखील पतीकडून मारहाण झाली, एवढंच नव्हे तर जीव मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल रोखण्यात आले, असा आरोप आहे.
११ मार्च रोजी पत्नीच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तहसीलदार शेंबटवाड यांच्यासह त्यांचे आई-वडील आणि डॉक्टर असलेल्या दोन भावांविरोधात कौटुंबिक छळ, अघोरी प्रथा आणि जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
१३ एप्रिल रोजी पोलिसांनी नांदेडमध्ये त्यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तपास पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे करीत आहेत.
दरम्यान, पीडित पत्नीने सासरी जादूटोण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
सरकारी अधिकाऱ्यांकडून असा अमानुष वागणूक अपेक्षित नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Nanded police @Nandedpolice #crime)

