गडचिरोलीतील प्लॅटिनम शाळेचा झळाळता यश : सीबीएसई दहावी-बारावीचा १००% निकाल, शौर्य रायपुरे प्रथम

136

गडचिरोलीतील प्लॅटिनम शाळेचा झळाळता यश : सीबीएसई दहावी-बारावीचा १००% निकाल, शौर्य रायपुरे प्रथम

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १५ : प्लॅटिनम ज्युबिली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोलीने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात आपली चमक सिद्ध केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १०वी आणि १२वीच्या निकालात शाळेने १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत संपूर्ण जिल्ह्यात खळबळजनक यश संपादन केले आहे.

१०वीच्या परीक्षेत एकूण १०० पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील शौर्य सुधाकर रायपुरे याने ९७.२% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर अर्जुन आनंद मोडक (९६.२%), अर्जुन राजेंद्र भुयार (९६%), श्रेयश कुद्रपवार (९५.८%), मृणाली गेडाम (९५%) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

१२वीच्या परीक्षेतही २५ पैकी सर्व २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साई सुनील बुद्धे (८७.२%), साक्षात सचिन हर्षे (८७%), शक्ती आखाडे, साक्षी सहारे आणि आलिया नाथानी आदी विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली.
या यशाबद्दल शाळेचे महासचिव अझीझ नाथानी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे यश हे शाळेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीचे आणि शिक्षकांच्या समर्पणाचे फलित आहे. हे यश भविष्याचे मजबूत पायाभूत ठरेल.”
प्राचार्य रहीम अमलानी यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत म्हटले, “हे केवळ गुणांचे यश नसून एक संस्कारयुक्त पिढी घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
प्लॅटिनम शाळेच्या या ऐतिहासिक निकालामुळे संपूर्ण गडचिरोलीत आनंदाचे वातावरण आहे. संस्थेच्या शिक्षणातील ‘प्लॅटिनम क्षण’ साजरे करताना विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन सर्वजण गर्वाने भरले आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @platinum Jubilee School @CBSE )