श्रीराम फायनान्स लिमिटेड, चंद्रपूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

237

– रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; समाजात रक्तदानाविषयी जनजागृतीला चालना

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर, ४ जुलै :- श्रीराम फायनान्स लिमिटेड, चंद्रपूर शाखेच्या वतीने आणि शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण १७ रक्तदात्यांनी स्वखुशीने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श ठेवला.
शिबिराचे आयोजन श्रीराम फायनान्स लिमिटेडचे वरिष्ठ मुख्य व्यवसाय प्रमुख श्री. चंद्रशेखर देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर शाखा प्रमुख श्री. चंद्रदीप चलाख यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
चंद्रपूर शाखेतील सर्व कर्मचारी वर्ग या उपक्रमात सक्रियपणे सहभागी झाला होता. आयोजकांनी व्यक्त केले की, अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण होते आणि इतरांनाही प्रेरणा मिळते.
“रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून आयोजित हे शिबिर सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित करणारे ठरले.