“राजकारणात सक्रीय, शेतात कार्यरत : शालिनीताई पेंदाम यांचा दुहेरी झेंडा”

415

– स्त्रीशक्तीचा जिवंत उद्गार ठरलेली प्रेरणादायी कृती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- सत्तेच्या राजकारणात महिला पुढे येत असतानाच महिला काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या शालिनीताई पेंदाम यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच, शालिनीताईंनी आज आपल्या शेतात प्रत्यक्ष उतरून भात रोपांची रोहणी करत मातीतल्या कष्टाला सलाम केला.
हे केवळ शेतीचे काम नव्हते, तर महिला सशक्तीकरणाचा ठसठशीत संदेश होता. शहर असो वा गाव, राजकारण असो वा शेती – स्त्री कुठेही कमी नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून प्रभावीपणे दाखवून दिले आहे.
शालिनीताईंचा संयम, कष्ट, आणि कार्यनिष्ठा हे आजच्या तरुण महिलांसाठी प्रेरणादायी ठरतात. “नेतृत्व सांभाळतानाही मातीशी नाळ तुटू नये” हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे.
या कृतीमुळे ग्रामीण महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, “शेतीही करू, नेतृत्वही सांभाळू!” हा संदेश ग्रामीण भागात महिलांसाठी नवा आत्मविश्वास घेऊन येत आहे.