भरधाव पिकअपची धडक ; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

210
  • भरधाव पिकअपची धडक ; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- मुरूमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमपायली गावाजवळ भीषण अपघात घडला. मुरूमगाव ते धानोरा या मुख्य रस्त्यावर २ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास पिकअप क्र. MH-33-T-4718 च्या वाहन चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मोटारसायकल क्र. WB-92-K-5487 ला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालक गुमास्ता यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मृतकाची पत्नी सौ. फिरोजाबातुम गुमास्ता (वय २३ वर्षे, रा. सोलपारा, ता. गोलपोखर, जि. उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल) यांनी मुरूमगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पिकअप वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो.उपनि. राहुल चौधरी करीत आहेत.
अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. मौजा आमपायली (पश्चिम ४ कि.मी.) या ठिकाणी घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

@lokvrutt.com #lokvruttnews #gadachirolinews #today_news #gadachirolipolice #Maharashtra police #Maharashtra #accident