गडचिरोलीत अवैध सुगंधित तंबाखू कारखान्यावर पोलिसांची धडक कारवाई

365

७.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर :- महाराष्ट्र शासनाने उत्पादन, विक्री व वाहतुकीस प्रतिबंध घातलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध कारखाना उभारणाऱ्या टोळीवर गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सुमारे ७,८४,२०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपी ओमप्रकाश शंकर गेडाम याला अटक करण्यात आली असून चार आरोपी फरार आहेत.
दिनांक २ सप्टेंबर रोजी डार्ली ता. आरमोरी येथे सौ. रेखाबाई सडमाके यांच्या घरात मशिनच्या सहाय्याने तंबाखू उत्पादन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ठिकाणाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात तयार तंबाखू, कच्चा माल तसेच उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरीचा साठा मिळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये मजा १०८ हुक्का शिशा तंबाखूचे भरलेले टिनाचे डबे, कच्चा तंबाखू, विविध पॅकींग मशिन्स, वजन काटा, शिलाई मशिन, इलेक्ट्रिक मोटर, फिलिप्स कंपनीचे हेअर स्ट्रेटनर, तसेच मोठ्या प्रमाणात रिकामे डबे, झाकणं, प्लॅस्टीक पिशव्या व इतर साहित्य यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पो.उ.नि. संतोष कडाळे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या देखरेखीखाली, स्था. गु. शा. निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. समाधान दौड, पोहवा प्रमानंद नंदेश्वर, पोअं राजकुमार खोब्राागडे, रोहित गोंगले व चापोअं गणेश पवार यांनी पार पाडली.

#गडचिरोली #तंबाखू #पोलिसकारवाई #MarathiNews @lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Gadchirolipolice @naxal_chakmak #Chandrapurnews #RoadSafety #Accident #PublicWorks #Administration #Maharashtra