महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; जिल्ह्यांची यादी स्पष्ट
लोकवृत्त न्यूज
मुंबई दि.१२ :- महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जाती (महिला) निश्चित झाले आहे.
या घोषणेनंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महिला उमेदवारांना अनेक ठिकाणी संधी मिळाल्यामुळे स्थानिक स्तरावरील निवडणुकीत महिलांची ताकद अधिक वाढणार आहे.
३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची प्रमुख यादी
1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)
2. पालघर – अनुसुसूचित जमाती
3. रायगड- सर्वसाधारण
4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
5. सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
6. नाशिक -सर्वसाधारण
7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
8. नंदूरबार-अनुसूचित जमाती
9. जळगांव – सर्वसाधारण
10. अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
11. पुणे -सर्वसाधारण
12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
13. सांगली – सर्वसाधारण (महिला)
14. सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
17. जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
18. बीड – अनुसूचित जाती (महिला)
19. परभणी – अनुसूचित जाती
20. हिंगोली -नागरिकांचा मागास प्रवर्ग
21. नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
22. धाराशिव – सर्वसाधारण (महिला)
23. लातूर – सर्वसाधारण (महिला)
24. अमरावती – सर्वसाधारण (महिला)
25. अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
26. वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
27. बुलढाणा -सर्वसाधारण
28. यवतमाळ – सर्वसाधारण
29. नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
30. वर्धा- अनुसूचित जाती
31. भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
32. गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
33. चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला )
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आगामी निवडणुकांची रंगत आणखी वाढणार आहे.
#lokvruttnews #Lokvrutt News @Lokvrutt.com
#gadchirolinews #gadchirolipolice #महाराष्ट्र #लोकवृत्त #जिल्हापरिषद #अध्यक्षपदआरक्षण #ZPReservation #Election2025 #MaharashtraPolitics #महिला_सक्षमीकरण #LocalBodyElections #ECI #ग्रामविकास

