तोळोधी मोकासा ग्रामीण भागातील BSNL नेटवर्क समस्या सुटली
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २२ : तळोधी मोकासा आणि जवळील ग्रामीण भागातील BSNL नेटवर्कची समस्या गेल्या वर्षभरापासून नागरिकांसाठी गंभीर अडचणी निर्माण करत होती. लाईट गेल्यास नेटवर्क खंडित होत असल्याने स्थानिक रहिवाशांना महत्वाचे व्यवहार आणि अतितातडीचे कामे वेळेत करता येत नव्हते.
या परिस्थितीची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. अंकुश संतोषवार मनविसे यांनी चामोर्शी व गडचिरोली येथील BSNL कार्यालयाचा ध्यास घेतला. बॅटरी उपलब्ध न झाल्यास खडखट्ट्याक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ताबडतोब कार्यालयाने आवश्यक बॅटरी उपलब्ध करून दिली.
यामुळे तळोधी मोकरा व परिसरातील BSNL सिम वापरकर्त्यांनी सेवा सुरळीत चालू राहण्याबद्दल आभार व्यक्त केले.










