राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पंढरपूर येथे सत्कार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोल : व्हॉईस ऑफ मिडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांना व्हॉईस ऑफ मिडिया जगातील क्रमांक एक असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात राज्य शिखर अधिवेशन १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात पार पडले त्यावेळी त्यांना हा पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते देण्यात आला.
व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार हे गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यात संघटनेच्या शाखा निर्माण करून ३०० च्या वरून सदस्य संख्यांची भर घातली आहे. पंढरपूर येथील राज्य शिखर अधिवेशनाला त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ७५ पत्रकारांनी सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यातील पत्रकारांना राहण्याची सोय करण्यासाठी येत्या वर्षभरात गडचिरोली येथे पत्रकार भवन उभारण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले आहे.
व्यंकटेश दुड्डमवार जिल्हाध्यक्ष पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










