Home Breaking News रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची NCC च्या विद्यार्थ्यांना धडक, दोघे गंभीर

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची NCC च्या विद्यार्थ्यांना धडक, दोघे गंभीर

408

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची NCC च्या विद्यार्थ्यांना धडक, दोघे गंभीर

लोकवृत्त न्यूज
ब्रम्हपुरी : कुर्झा–बोंडेगाव रस्त्यावर अवैध रेती भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने झेंडा वंदनाच्या परेडसाठी जात असलेल्या दोन NCC विद्यार्थ्यांना जबर धडक दिल्याची घटना २६ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास राधाकृष्ण नगरीजवळ घडली. या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
एस. प्रकाश मेश्राम (वय १४) हा किरकोळ जखमी झाला आहे, तर रोनक राजू नागापुरे (वय १४) याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. दोन्ही विद्यार्थी ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई शाळेचे NCC विद्यार्थी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही अहेरी–नवरगाव परिसरातून एन.एच. कॉलेजमध्ये आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमासाठी मोटारसायकलने जात होते. त्याच वेळी ब्रम्हपुरीकडून अवैध रेती भरून भरधाव वेगाने येणाऱ्या MH-34 CD 7668 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली.
या प्रकरणी सोनू मेश्राम यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक दुर्योधन तलमले भालेश्वर याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
दरम्यान, अवैध रेती वाहतूक व भरधाव वाहनांमुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येत असल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Don`t copy text!