Home गडचिरोली जिद्द आणि मेहनतीने यश खेचून आणा : आमदार सुधाकर अडबले – निमगावच्या...

जिद्द आणि मेहनतीने यश खेचून आणा : आमदार सुधाकर अडबले – निमगावच्या विद्यार्थ्यांना आवाहन

204

जिद्द आणि मेहनतीने यश खेचून आणा : आमदार सुधाकर अडबले
– निमगावच्या विद्यार्थ्यांना आवाहन

लोकवृत्त न्यूज
​धानोरा : “बोर्डाची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेत घाबरून न जाता, नियोजित अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करावे व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांनी केले.
​धानोरा तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयाला मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आमदार अडबले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
​दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार अडबले यांनी अभ्यासाचे नियोजन आणि पेपर सोडवण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे नव्हे, तर दर्जेदार यश मिळवून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर खालील मान्यवर … अजय लोंढे (सिनेटर सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) ​बी. डब्ल्यू. सावसाकडे (मुख्याध्यापक, गणेश अलंकार विद्यालय) ​शिक्षक वृंद: नरेंद्र भोयर, बापू मुन्घाटे, मशाखेत्री, दिवाकर भोयर, एस. व्ही. नागदेवते.
​कु. बी. व्ही. श्रीरामे मॅडम व अन्य शिक्षकेत्तर कर्मचारी.
​कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांच्या या भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Don`t copy text!