१३ वर्षीय पुतणीवर अत्याचार ; भामरागड तालुक्यातील संतापजनक प्रकार

1442

१३ वर्षीय पुतणीवर अत्याचार ; भामरागड तालुक्यातील संतापजनक प्रकार

लोकवृत्त न्यूज
भामरागड : तालुक्यातील येवली परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने तब्बल तीन वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मन्नेराजाराम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडिता ही भामरागड तालुक्यातील असून ती शिक्षण घेत आहे. आरोपी दुर्गे (अंदाजे वय ४८ वर्षे) हा नातलग असून नात्याने काका लागतो. आरोपीने तीन वर्षे पीडितेवर लैंगिक अत्याचार केले तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, पीडितेने आपल्या आईसोबत मन्नेराजाराम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या तक्रारीवरून पोस्टे येथे भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(१), ३५१ (२) (३) भा.न्या.स. सहकलम ४,६ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि शुभम बी. शिंदे यांचे कडे वर्ग करण्यात आला.