Home Breaking News भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात

भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात

65

• कारचा चेंदमेंदा, चौघे थोडक्यात बचावले

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली :- गडचिरोली-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर आज, १७ मे रोजी सकाळच्या सुमारास भरधाव कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून, कारमधील चारही जण सुदैवाने सुखरूप बचावले. ही घटना बी-फॅशन प्लाझा समोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील मालेरचक येथील उमेश कुकडे हे आपल्या एमएच ३३ व्ही २२१३ क्रमांकाच्या कारने गडचिरोली शहराकडे येत होते. दरम्यान, बी-फॅशन प्लाझा परिसरात अचानक कारचा पुढील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार भरधाव वेगात महामार्गावर उलटली. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चेंदामेंदा झाली. मात्र, सुदैवाने कारमधील चौघांनाही केवळ किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. ही घटना सकाळच्या वेळी घडल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची वर्दळ कमी होती. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, एवढा गंभीर अपघात होऊनही संबंधितांकडून पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही़

Don`t copy text!