Home Breaking News ॲक्सिस बॅक ने दिला मृत जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

ॲक्सिस बॅक ने दिला मृत जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

554

मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १५ मार्च:- बैंक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे. दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी शामराव वैरागडे हे कर्तव्यावर असतांना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन ऑक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी नामे श्रीमती छाया शामराव वैरागडे यांना आर्थीक मदत स्वरुपात मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब, यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला. यावेळी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता साहेब, तसेच ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, राकेश राजेंद्र बल्लालवार यांचे उपस्थितीत मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

Don`t copy text!