Home गडचिरोली १९ सप्टेंबरला आष्टी येथे वंचितचे ‘रास्ता रोको आंदोलन’

१९ सप्टेंबरला आष्टी येथे वंचितचे ‘रास्ता रोको आंदोलन’

276

– राष्ट्रीय महामार्ग व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या समस्या सोडविण्याची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१८ :- महामार्ग व शेतक-यांच्या समस्यां शासनाने तात्काळ सोडवाव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजतापासून आष्टी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या तिन वर्षापासून आष्टी-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे निर्माणाधीन असलेले थंडबस्त्यातील काम त्वरीत सूरू करण्यात यावे, चामोर्शी- हरणघाट रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, चामोर्शी तालुक्यातील शेतक-यांच्या शेतजमिनी जोरजबरदस्तीने अधिग्रहन करून शेतक-यांना भूमिहीन करण्याचे प्रकार शासन व कंपन्यांनी त्वरीत थांबवावे, ज्या शेतक-यांच्या शेत जमिनी शासन व कंपन्यांनी जोरजबरदस्तीने अधिग्रहन केले आहे त्या शेतक-यांच्या कुटूंबातील एका सदस्याला प्रकल्पग्रस्त म्हणून विनाअट शासकिय नौकरीत त्वरीत घेण्यात यावे, शेतक-यांना वनहक्काचे पट्टे वितरीत करून सातबारा त्वरीत देण्यात यावे आदि मागण्यांच्या पूर्ततेसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, महासचिव राजरतन मेश्राम, महासचिव मंगलदास चापले, संगठक भिमराव शेंडे, उपाध्यक्ष जी.के.बारसिंगे, उपाध्यक्ष विलास केळझरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, युवक आघाडी उपाध्यक्ष कवडू दुधे, शेतकरी नेते बाळू गौरकार, सतिश पाटील ताजणे, रमेश पिंपळकर,रविंद्र पिदुरकर, दादाजी बल्की, तालुकाध्यक्ष एड. अनंत उंदिरवाडे, महिला आघाडी प्रभारी जया रामटेके, युवा नेते, सुरज कुकूडडकर, अमित नगराळे, छोटू दुर्गे, राहुल फुलझेले, प्रकाश डोर्लीकर, राहुल फुलझेले आदि करणार आहेत.
या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा चामोर्शीच्या वतिने करण्यात आले आहे.

Don`t copy text!