ग्रामपंचायत साखरा येथे आयुर्जल शुध्द जल केंद्राचे थाटात उद्घाटन

0
327

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 8 ऑक्टोबर : तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथे नागपूर येथील समविद इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, नटराज निकेतन संस्था मैत्री परिवार संस्था,हल्दीराम ट्रस्ट नागपूर आणि स्पर्श संस्था गडचिरोलीच्या संयुक्त विध्यमाने मिनरल वाटर प्लांट चे ग्रामपंचायत साखरा येथे आज ८ ऑक्टोबर रोजी आयुर्जल शुध्द जल केंद्राचे थाटात उद्घाटन पार पडले.
ग्रामपंचायत साखरा येथे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम आरओ फिल्टर प्लॅन्टची उभारणी केली आहे.
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, तालुक्यातील बहुतांश गावांत अशाप्रकारे आरओ प्लॅन्ट कार्यरत असून, याच धर्तीवर साखरा येथे नागपूर येथील समविद इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, नटराज निकेतन संस्था आणि स्पर्श संस्था गडचिरोली च्या संयुक्त विध्यमाने मिनरल वॉटर प्लॅन्टची उभारणी केली आहे.
ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना पाणी ATM कार्ड दिले जाणार असून, याद्वारे 5 रुपयात 15 लिटर शुद्ध थंड पाणी घेता येणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा वनसंरक्षण अधिकारी डॉ. किशोर मानकर तर अध्यक्ष म्हणून सौ. मंगलाताई पात्रीकर, नटराज निकेतन संस्था, प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद विलास पत्रीकर, निखील व्यास, तहसिलदार गणविर, रोहीदास राऊत राष्ट्रीय उपाध्यक्ष अ.भा.री.पक्ष गडचिरोली, माजी सभापती ईचोडकर, हंसराज उंदिरवाडे जिल्हा सरचिटणिस अ.भा.री. पक्ष, मिना सहारे, ज्योती उंदिरवाडे तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मटके मॅडम यांनी तर आभार सरपंच पुण्यवान सोरते यांनी केेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here