Home गडचिरोली गडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा :-आमदार डॉ. होळी

गडचिरोलीच्या जंगलातील रानटी हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करा :-आमदार डॉ. होळी

451

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्या.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.३० :-गडचिरोली तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे जीवितहानीची ही शक्यता बळावलेली आहे करिता भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी वनविभागाकडे केली आहे.

या रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे झालेले शेतीचे नुकसान त्यांचें पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची वनविभागाने व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या रानटी हत्ती मुळे सर्वसामान्य लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात लोकांचे जीव जाण्याची शक्यताही बळावलेली आहे. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने या संदर्भात तातडीने पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. करिता वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी केली आहे.

या संदर्भात आपण वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून वनमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेणार असल्याचे म्हणाले.

Don`t copy text!