गडचिरोली : वनाधिकाऱ्यांची संगनमताने रेती तस्करांचा ‘रात्रीस खेळ चाले’

469

– वन नाल्यातून अवैध रेती तस्करी, वनाधिकारी निद्रावस्थेत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१०: जिल्हा हा गौण खनिज संपत्तीने नटलेला आहे. मात्र याची लूट होऊ नये यासाठी प्रशाकीय अधिकारी असताना सुद्धा त्यांच्या नजरेदेखद लूट होतानाचे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या गुरवळा वन बीटातील वन नाल्यामधून रेतीची अवैध रित्या उत्खनन करून लूट केली जात आहे. वनविभागाच्या अखत्यारीतील असलेल्या रेतीची लूट होत असताना वनाधिकारी काय करीत आहे ? राजरोसपणे रेतीची चोरी होत असताना मात्र गेंड्याची कातडी पांघरून असलेल्या वनाधिकाऱ्यांना याचे भान कधी येणार ? वन अधिकाऱ्यांसह वन कर्मचारी निद्रावस्थेत गेले आहे काय ? असे विविध सवाल उपस्थित होत असून वनाधिकाऱ्यांच्या संगनमतानेच रेती तस्करी होत असल्याचे बोलल्या जात आहे. रात्रौच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने रेतीचा उपसा करून ट्रक, ट्रॅक्टरने अवैध वाहतूक केली जात आहे. रेती तस्करांचा हा ‘रात्रीस चालणार खेळ’ मात्र वनाधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहताना दिसत असून वनकायद्यांना मात्र स्वतःच वनाधिकारी धाब्यावर चढवताना दिसत आहेत.
रेती तस्करांच्या ह्या ‘रात्रीस चालणाऱ्या खेळाला’ वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल यांचा छुपा पाठिंबा असल्याचे दिसून येत असून गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतातरी जाग येणार काय व अवैध रेती तस्करीला आळा बसणार काय याकडे लक्ष लागले आहे.