गडचिरोली जिल्ह्यातील 650 दिव्यांगाना दिव्यांग साहीत्य, दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप

664

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग महामेळाव्याचे आयोज

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २२ ऑगस्ट :- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनाचा लाभ येथील गरजू आदिवासी नागरिकांना मिळावा व त्यांनी आपले जीवनमान उंचवावे, यासाठी गडचिरोली पोलीस दल सधै प्रयत्नशिल असते. याचाच एक भाग म्हणून मा. पोलीस अधीक्षक की अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून, गडचिरोली पोलीस दल, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ, विभाग चिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व स्तरातील दिव्यांगासाठी दिनांक २२/०८/२०२२ रोजी दिव्यांग महामेळावा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल, गडचिरोली येथे पार पडला.

सदर दिव्यांग महामेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ६५० दिव्यांगाची तपासणी करून त्यांना दिव्यांग साहीत्य, दिव्यांग प्रमाणपत्र व बस सवलत कार्डचे वाटप करण्यात आले. ज्या दिव्यांग नागरीकांना व्हिलचेअरची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मोफत व्हिलचेअर वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित करतांना मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दूर काव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.

सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  समीर शेख सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा., तसेच डॉ. इंद्रजित नागदेवते (फिजीशियन), डॉ. मनीष मेश्राम (मानसिक रोग वश जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, श्रीमती पी डी पारसे सहायक लेखा अधिकारी, गडचिरोली गा. गंगेश पांडे, आगार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परि. वि. गडचिरोली हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे उपपोस्टे, पोमकेचे सर्व अधिकारी य अंगलवार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. महादेव शेलार व अंमलदार, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, समाज कल्याण कार्यालय गडचिरोली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोलीच्या टीमने अथक परिश्रम घेतले.