इतर तालुक्यातील बांधकाम कामगारांनी उपस्थित राहून नये
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०३: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत गडचिरोली जिल्हयातील नोंदणीकृत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना मंडळाद्वारे नियुक्त संस्थेमार्फत गृहपयोगी संच वितरण बालाजी सभागृह, चामोर्शी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे दिनांक 03 एप्रिल 2025 रोजी पासून सुरू करण्यात आले आहे.
सदर वाटप हे चामोर्शी तालुक्याकरीताच आयोजित केलेले असून त्याअनुषंगाने दररोज 700 गृहउपयोगी संच वितरण करावयाचे उदिष्ट ठरविले आहे. दरदिवशी 700 बांधकाम कामगारानां दुरध्वनी द्वारे बोलवण्यात येईल व त्याच कामगारांची यादी वाटप स्थळी उपलब्ध राहील त्यामुळे ज्या कामगारांचे यादीत नाव नसेल व ते कामगार स्वतः हुन वाटप स्थळी उपस्थित झाल्यास त्यादिवशी त्यांना प्रवेश नाकारण्यात येईल. याची बांधकाम कामगारानी नोंद घ्यावी.
गडचिरोली जिल्ह्यातील उर्वरित तालुक्याच्या ठिकाणी गृहउपयोगी संच वितरण करण्याच्या संदर्भात मंडळाचे वतीने नियोजन सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणचे स्थळ व दिनांक निश्चित झाल्यानंतर वरील प्रमाणे लाभार्थी कामगाराना दुरध्वनीद्वारे तसेच प्रसारमाध्यमाद्वारे कळविण्यात येईल. तदपुर्वी इतर तालुक्यातील लाभार्थी कामगारांनी सद्धास्थितीत सुरू असलेल्या चामोर्शी येथील गृहपयोगी संच वाटपाचे ठिकाणी उपस्थित राहू नये.
सदरचे नियोजन हे बांधकाम कामगारांच्या सोई करीता तसेच वाटप स्थळी विनाकारण गदर्दी होउन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने करण्यात आलेले आहे. तसेच संच वितरण बंद होणार आहे किंवा नंतर मिळणार नाही अशा चुकीच्या संदेशावर, अफवांनवर कोणीही विश्वास ठेवू नये तसेच अनधिकृत दलालाच्या आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, यांचे कार्यालय, गडचिरोली मार्फत करण्यात येत आहे.










