– संघर्ष, निष्ठा आणि नेतृत्वगुणांची पावती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- निष्ठावान कार्यकर्ती, सामाजिक भान जपणारी नेतृत्ववृत्ती आणि अपार संघर्षमय वाटचाल या गुणांच्या जोरावर कल्पनाताई नंदेश्वर यांची गडचिरोली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मिळालेला हा सन्मान, काँग्रेस पक्षातील महिलांच्या सशक्तीकरणाची दिशा अधोरेखित करणारा ठरत आहे.
कल्पनाताईंनी आजवर महिलांच्या हक्कांसाठी, सामाजिक प्रश्नांसाठी आणि पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी सातत्याने लढा दिला आहे. आता त्या नेतृत्वाच्या भूमिकेतून हेच संघर्ष अधिक प्रभावीपणे राबवतील, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या असून, महिला काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल, असा उत्साह पक्षात दिसून येतो आहे.










