ट्रॅफिक सिग्नलही नाही सोडले : गडचिरोलीत बिनधास्त बॅनरबाजी, प्रशासन गाढ झोपेत

579

ट्रॅफिक सिग्नलही नाही सोडले : गडचिरोलीत बिनधास्त बॅनरबाजी, प्रशासन गाढ झोपेत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ८ ऑगस्ट :- शहरात कोणताही सण, उत्सव, राजकीय कार्यक्रम आला की काही हौशी पुढारी आणि नवख्यांना प्रसिद्धी मिळवायची अनावर हौस चढते. त्यासाठी खाजगी हॉर्डिंग सोडून आता रस्त्यावरील पथदिवे, चौकातील सिग्नलचे खांबही “फुकट प्रसिद्धी”च्या माध्यमाचे ठिकाण बनले आहेत.
शहरातील इंदिरा गांधी चौक, आणि मुख्य मार्गांवर असल्या रस्तादुभाजावरील पथदिव्यांच्या खांबाना तसेच इंदिरा गांधी चौकात सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या पुतळ्यांच्या सभोवताल सर्रास बॅनर, पोस्टर, हार्डिंग लावण्यात आले आहेत. नव्याने सुरू झालेल्या ट्रॅफिक सिग्नलवर देखील प्रचार बॅनर लावण्यात आले असून, वाहतुकीसाठी महत्त्वाच्या या सिग्नलची दृश्यता कमी झाली आहे. हे प्रकार केवळ नियमबाह्यच नव्हे, तर अपघाताला आमंत्रण देणारेही आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात खुलेआम सुरु आहेत, तरीही नगर परिषदेचे प्रशासन गाढ झोपेत आहे. यावरून असा सवाल उपस्थित होतो की, प्रशासन मुद्दामून डोळेझाक करत आहे का? की निव्वळ काही दिवस दाखवायची कारवाई करून स्वतःची जबाबदारी झटकत आहे?
शहरातील नागरिकांनी या बेकायदेशीर बॅनरबाजीविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. अन्यथा नियमांचे तीन तेरा वाजवत ही “प्रसिद्धीची हौस” भविष्यात एखाद्या मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते.
#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal @accident
#गडचिरोली #बॅनरबाजी #ट्रॅफिकसिग्नल #नगरपरिषद #प्रसिद्धीचीहौस