लोकवृत्त न्यूज
नवी दिल्ली, दि. ०९ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते.
या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले, त्यापैकी 15 मते अवैध ठरली. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर रेड्डी यांना 300 मते मिळाल्याने एनडीएचा दणदणीत विजय निश्चित झाला.
लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण 788 खासदार असले तरी 7 जागा रिक्त आहेत. याशिवाय 13 खासदारांनी मतदान न करता दूर राहणे पसंत केले. त्यामुळे अपेक्षित 781 मतांऐवजी 768 मतांची मोजणी झाली. मतदान टाळणाऱ्यांमध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचा १ आणि एक अपक्ष खासदार यांचा समावेश आहे.
एनडीएचे 427 खासदार मतदानासाठी हजर राहिले होते. निकालानंतर संसदीय राजकारणात एनडीएची ताकद पुन्हा अधोरेखित झाली असून, इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
#lokvruttnews @LOKVRUTT.COM #CPRadhakrishnan #VicePresidentElection #NDAVictory #INDIAAlliance #IndianPolitics #Parliament #Delhi #BreakingNews
#सीपीराधाकृष्णन #उपराष्ट्रपतीनिवडणूक #एनडीएविजय #इंडियाआघाडी #राजकारण #संसद #दिल्ली #ताजाबातमी #लोकवृत्त














