नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव ; एकूण १३ प्रभागांमध्ये विविध गटांचे प्रतिनिधित्व
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ८ ऑक्टोबर :- दिवाळीनंतर होऊ घातलेल्या गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणासह प्रत्येक प्रभागाचा भूगोल, लोकसंख्या आणि सामाजिक रचना जाहीर करण्यात आली. नगरपरिषदेचे प्रशासक रणजीत कुमार यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोडतीत हा निकाल निश्चित झाला. या वेळी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वीच घोषित झालेल्या सोडतीनुसार नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून, या निकालानंतर शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.
प्रभागनिहाय लोकसंख्या, आरक्षण व भूगोल :
प्रभाग क्र. १ – महात्मा ज्योतीबा फुले (लोकसंख्या: ४२२०)
अनु.जा. ९४८ | अनु.ज. ३५०
प्रभागाची व्याप्ती – शिवाणी पेट्रोल पंप परिसर, श्री मंगल कार्यालय, राम मंदिर परिसर, गांधी वार्ड, आशिर्वाद मंगल कार्यालय परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. २ – लांझेडा (लोकसंख्या: ३९५२)
अनु.जा. ४२९ | अनु.ज. ६४८
व्याप्ती – लांझेडा परिसर, नगर परिषद कार्यालय परिसर, चिचाळा तलाव परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ३ – स्नेहनगर (लोकसंख्या: ४०४४)
अनु.जा. ५५९ | अनु.ज. ४६९
व्याप्ती – इंदिरानगर परिसर, स्नेहनगर, शिवाजी कला महाविद्यालय परिसर.
आरक्षण: (अ) सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४ – रामनगर (लोकसंख्या: ४२०१)
अनु.जा. ७६४ | अनु.ज. १७६
व्याप्ती – रामनगर परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५ – छत्रपती शाहू नगर (लोकसंख्या: ४०४०)
अनु.जा. ९६० | अनु.ज. ५०२
व्याप्ती – रेडी गोडाऊन चौक, कन्नमवार नगर, विवेकानंद नगर, शाहू नगर परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६ – कॅम्प एरिया (लोकसंख्या: ४०८०)
अनु.जा. ४८९ | अनु.ज. ५१९
व्याप्ती – कॅम्प एरिया परिसर.
आरक्षण: (अ) सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ७ – गणेश नगर (लोकसंख्या: ३८४७)
अनु.जा. ७२६ | अनु.ज. ४५१
व्याप्ती – पोलीस स्टेशन मागील भाग, रामपुरी शाळा परिसर, डॉ. कुंभारे हॉस्पिटल व गणेश मंदिर परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ८ – महात्मा गांधी (लोकसंख्या: ३७४५)
अनु.जा. १८२ | अनु.ज. ३००
व्याप्ती – ढिवर मोहल्ला, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, केदारवाडा व राम मंदिर परिसर.
आरक्षण: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९ – हनुमान नगर (लोकसंख्या: ३८२४)
अनु.जा. ४७ | अनु.ज. २३०
व्याप्ती – हनुमान वार्ड परिसर.
आरक्षण: (अ) सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १० – विसापूर (लोकसंख्या: ४०६०)
अनु.जा. ४३४ | अनु.ज. १११५
व्याप्ती – पोलीस संकुल परिसर, विसापूर, एल.आय.सी. कॉलनी परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ११ – सोनापूर (लोकसंख्या: ३८६४)
अनु.जा. ७३२ | अनु.ज. ८४८
व्याप्ती – सोनापूर कॉम्प्लेक्स परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जमाती महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२ – झाशी राणी नगर (लोकसंख्या: ४०६९)
अनु.जा. ७३९ | अनु.ज. ५६१
व्याप्ती – कारगिल चौक, चनकाईनगर, शिक्षक कॉलनी, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर.
आरक्षण: (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ – गोकुलनगर (लोकसंख्या: ५२०६)
अनु.जा. १८२७ | अनु.ज. ९६९
व्याप्ती – गोकुलनगर परिसर.
आरक्षण: (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला, (क) सर्वसाधारण महिला
या आरक्षण व प्रभाग संरचनेनंतर गडचिरोली शहरातील निवडणुकीची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून महिलांच्या उमेदवारीवर भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#gadchirolinews #lokvruttnews @lokvrutt.com #gadchirolipolice #Gadchiroli #MunicipalCouncil #Election2025 #WardReservation #WomenReservation #LocalBodyElections #MaharashtraPolitics #GadchiroliNews #TheGadVishva #UrbanDevelopment #PoliticalUpdates













