गडचिरोली पोलिस दलात ७४४ पदांची मोठी भरती

313

गडचिरोली पोलिस दलात ७४४ पदांची मोठी भरती : जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ : गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ या वर्षासाठी एकूण ७१७ पोलिस शिपाई आणि २७ पोलिस शिपाई चालक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व २०१९ तसेच संबंधित सुधारणांनुसार केली जाणार असून याबाबतची अधिकृत जाहिरात क्र. पोअग/आस्था/प्र.लि./पो.शि.भ. २०२४-२०२५/२०२५ अशी जारी करण्यात आली आहे.

अधिकृत जाहिरात डाउनलोड करा :

पोलीस शिपाई भरती जाहिरात

पोलीस शिपाई चालक भरती जाहिरात

स्थानिकांना प्राधान्य – गोंडी व माडीया भाषेची चाचणी आवश्यक

महाराष्ट्र शासन, गृह विभागाच्या आदेशानुसार (दि. २३ मार्च २०१८ व २३ सप्टेंबर २०२२) गडचिरोली जिल्ह्यातीलच उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार आहे. उमेदवारांकडे संबंधित तहसिलदारांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) असणे बंधनकारक आहे.
भरती प्रक्रियेत उमेदवारांना गोंडी व माडीया भाषेची लेखी परीक्षा द्यावी लागणार असून या परीक्षेसाठी १०० अतिरिक्त गुण निश्चित करण्यात आले आहेत. या परीक्षेत किमान ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे; तथापि, या गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीत विचार होणार नाही.

गडचिरोलीबाहेर बदली नाही

भरती झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस शिपाई व पोलिस शिपाई चालक जिल्ह्याबाहेर बदलीपात्र असणार नाहीत, अशी स्पष्ट अट शासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

लाचखोरीसंबंधी तक्रारींसाठी विशेष सूचना

भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी किंवा गैरव्यवहार झाल्यास उमेदवारांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली (दूरध्वनी क्र. ०७१३२-२९५०२०) येथे संपर्क साधावा. तसेच, इच्छुक उमेदवार पोलीस अधीक्षक, गडचिरोली किंवा अध्यक्ष, पोलिस भरती समिती २०२४-२०२५ यांच्याशी थेट संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात.

संपर्कासाठी हेल्पलाईन : समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली. मोबाईल क्रमांक : ८८०६३१२१०० (कार्यालयीन वेळेत)

गडचिरोली पोलिस भरती ही जिल्ह्यातील युवकांसाठी एक सुवर्णसंधी मानली जात असून, पात्र उमेदवारांना शासनाच्या निकषांनुसार अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#lokvruttnews @lokvrutt.com #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliPoliceRecruitment #PoliceConstable2024 #PoliceConstableDriver #GadchiroliSP #MaharashtraPolice #GovernmentJobs #PoliceBharti #GadchiroliDistrict #JobAlert #PoliceRecruitment2025 #SPGadchiroli #BhartiNews #MaharashtraGovernment #LawEnforcement #PoliceJobs #GadchiroliNews #GovtRecruitment #ConstableVacancy #PoliceDepartment #MadiyaGondiExam