गणेश अलंकार विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

139

गणेश अलंकार विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

लोकवृत्त न्यूज
​धानोरा : तालुक्यातील निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. महिला सूर्या आदिवासी विकास शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या या विद्यालयात, विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचा निरोप घेतला.
या ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजनी वासुदेव वरखडे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक लालाजी नगराळे, पुरुषोत्तम राजगडे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर गावळे, तसेच कु. श्रीरामे मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.
​इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले होते. शालेय जीवनातील शेवटचा दिवस असल्याने अनेक विद्यार्थी भावूक झाले होते. निरोप घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहित केले.​
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. नागदेवते यांनी अत्यंत खुबीने केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी दिवाकर भोयर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शालेय शिस्त, प्रेम आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.