रमेश काळबांडे यांचा ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा’ने गौरव

234

रमेश काळबांडे यांचा ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा’ने गौरव

लोकवृत्त न्यूज
​धानोरा(तालुका प्रतिनिधी): निमगाव जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे शिक्षक रमेश काळबांडे यांना नुकताच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या प्रतिष्ठित कंपनीच्या वतीने ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे निमगावच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, शाळेच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
​एका विशेष सोहळ्यात NPCI चे हेड ग्रुप (इंटरनल ऑडिट) दीपक मित्तल (CFE) आणि CSR ऑडिट प्रमुख मनीष दीक्षित यांच्या हस्ते काळबांडे सरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या (LLF) ट्रस्टी अॅग्नेस नेथन, उपाध्यक्ष रूपा भट्टाचार्य आणि व्यवस्थापक उज्वल गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. “एका दुर्गम भागातील शाळेला आधुनिक शिक्षणाकडे नेण्यासाठी शालेनिव सर्व शिक्षकांनी केलेले प्रयत्न आदर्शवत आहेत,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
​या सोहळ्यानिमित्त निमगावच्या स्थानिक नेतृत्वानेही आपले सहकार्य दाखवून दिले. मुख्याध्यापक देवेंद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षक चमू कोल्हे सर, कन्नाके सर, बोरकर मॅडम, नाकाडे मॅडम आणि ग्रामस्थांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
​शालेय व्यवस्थापन समिती: अध्यक्ष भजनजी वरखडे, उपाध्यक्ष रोषनि चापडे आणि सदस्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उपसरपंच चेतन सुरपाम , पोलीस पाटील ज्ञानेश्वर गावडे आणि यांसारख्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काळबांडे यांचे अभिनंदन करत शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
​दिपाली नैताम, महेश मेश्राम, नवनाथ चापडे आणि लोकमित्र बारसागडे यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​निमगाव शाळेचा ‘कॉर्पोरेट’ ब्रँड
​शिक्षणाला केवळ पुस्तकी मर्यादेत न ठेवता, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी देवेन्द्र लांजेवार,रमेश काळबांडे व सर्व शिक्षकांची चमू प्रयत्नशील आहे. NPCI आणि LLF फाउंडेशनच्या या दौऱ्यामुळे शाळेला भविष्यात डिजिटल लॅब आणि अद्ययावत पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
​”हा पुरस्कार केवळ एका शिक्षकाचा नसून, शाळेतील विद्यार्थी व संपूर्ण निमगावच्या एकजुटीचा विजय आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. या गौरवामुळे निमगाव शाळा आता जिल्ह्यासाठी एक ‘प्रगत शैक्षणिक मॉडेल’ म्हणून ओळखली जाणार आहे.