Home Breaking News गडचिरोली : स्कार्पिओ-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

गडचिरोली : स्कार्पिओ-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

478

गडचिरोली : स्कार्पिओ-दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ : चामोर्शी मार्गावरील समता नगर नजीक गुरुवारी (१९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्कार्पिओ आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कार्पिओ वाहन चामोर्शीहून गडचिरोली शहराच्या दिशेने येत होते, तर दुचाकीस्वार इंदिरा गांधी चौकाकडून आपल्या घरी समता नगर येथे जात होता. रस्त्यातील वळणाजवळ पोहोचताच दुचाकीस्वाराने अचानक उजवीकडे वळण घेतले. याच वेळी समोरून येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाशी त्याची जोरदार धडक झाली.
या अपघातात हेमंत देवनाथ शेंडे (वय ४६, रा. औंधी, जि. मानपूर, छत्तीसगड – सध्या मुक्काम गडचिरोली) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी नीतू हेमंत शेंडे (वय ३७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर स्कार्पिओ चालक सुधीर भुरले (वय ३१, रा. गडचिरोली) यांनी प्रसंगावधान राखत जखमी महिलेला व मृतदेहाला तात्काळ सामान्य रुग्णालयात हलवले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Don`t copy text!