आयसीएसईत वियानी विद्या निकेतनचे दणदणीत यश ; 100 टक्के निकालाची परंपरा कायम

169

आयसीएसईत वियानी विद्या निकेतनचे दणदणीत यश ; 100 टक्के निकालाची परंपरा कायम

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : तालुक्यातील मूरखळा केंद्रांतर्गत नवेगाव येथील वियानी विद्या निकेतन शाळेने आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत यंदाही उल्लेखनीय कामगिरी करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील एकूण 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्याने संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
निकालात आरुषी सहारे हिने 96.8 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अलीशा कुलसंगे हिने 95.2 टक्के गुणांसह द्वितीय, तर देवाशी झाडे हिने 94.6 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
एकूण निकालाचे विश्लेषण करता, 60 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक, 23 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक, 16 विद्यार्थ्यांनी 70 टक्क्यांपेक्षा अधिक, तर 12 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य फादर टॉमी चोवेलीकुडीयील, फादर सोमी वर्गीस, सिस्टर एल्सी, सिस्टर लिया, सिस्टर शिनी तसेच शिक्षकवृंद व पालकांना दिले. शाळेचे प्राचार्य फादर सोमी वर्गीस यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणातही सातत्य राखून नवे यश संपादन करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.