Home Breaking News निभोरा येथील योगेश सोनवणे दोन दिवसापासून बेपत्ता

निभोरा येथील योगेश सोनवणे दोन दिवसापासून बेपत्ता

1235

– कुठेही आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

लोकवृत्त न्यूज
जळगाव दि. 21. सप्टेंबर : जिल्हयातील धरणगाव तालुक्यातील निभोरा येथील योगेश रोहिदास सोनवणे हा युवक शेंद्रुनी येथे कामानिमित्त राहत होता. दरम्यान तो 19 सप्टेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार वडीलांनी पोलीस ठाणे पहुर जि. जळगाव येथे दाखल केली असून कुणास आढल्यास माहिती दयावी असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्हयातील निंभोरा येथील योगेश रोहिदास सोनवणे हा स्वातंत्र्य मायक्रो फिन फायनांन्स प्रायव्हेट लिमीटेड शेंदुर्णी ता. जामनेर येथे काम करित होतो. प्रकृती बरी नसल्याने तो 19 सप्टेंबर रोजी तो घरी येण्याकरिता 11 वाजता निघाला मात्र लोटुनही तो घरी न परतल्याने वडीलांनी 20 सप्टेंबर रोजी बेपत्ता असल्याची तक्रार पहुर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीसांनी तक्रार नोंदविली असून बेपत्ता युवक कुठे आढळल्यास माहिती दयावी असे आवाहन करण्यात आले आहे. दोन दिवस लोटुनही कुठेही योगेश चा थांगपत्ता न लागल्याने पोलीसांनी तपासाचे चक्र अधिक वेगात फिरविले असून कुटुंबातील व्यक्तीनीही सदर व्यक्तीचा कुठे आढळल्यास 8767831279 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Don`t copy text!