पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग नागरिक कृत्रिम अवयव उपकरण वाटप

389

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिव्यांग नागरिक कृत्रिम अवयव उपकरण वाटप मेळावा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.20 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “दिव्यांग नागरिक कृत्रिम अवयव उपकरण वाटप मेळावा” गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने तसेच अलिम्को कंपनी मुंबई, जनरल इन्श्युरंस कंपनी मुंबई, समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २०/०९/२०२२ रोजी पोलीस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृह गडचिरोली येथे पार पडला. सुंदर दिव्यांग मेव्याच्यास गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ४०० दिव्यांग नागरीक उपस्थित होते तसेच अतिदुर्गम भागातील ७० युवक-युवती ब्युटीपार्लर व फोटोग्रॉफी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्यापैकी कृत्रिम अवयय उपकरणाची आवश्यकता असलेल्या २६० दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व्हिलचेअर तीनचाकी सायकल, स्वयंचलित मोटार सायकल इत्यादी

कृत्रिम अवयय उपकरणाचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित करतांना मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी सांगितले की, आम्ही जिल्हयातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करु.

सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. याच्या संकल्पनेतून य मार्गदर्शनाखाली पार पडला असून कार्यक्रमास मा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी)  अनुज तारे सा.,  कमलेश यादव सी.एस.आर. कन्सलटंट, अलिम्को मुंबई, डॉ. कृष्णा मौर्या ऑडिओलॉजिस्ट, अल्मिको मुंबई, डॉ. निाश, अल्मिको मुंबई श्रीमती संगिता तुमडे, विकलांग समन्ययक आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे / पोमकेचे सर्व अधिकारी व पोलीस अमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनजय पाटील व पोलीस हमालदार यांनी अथक परिश्रम घेतले.