गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2022 उमेदवारांची प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी

775

आखिर प्रतिक्षा संपली खुशी गग्णात मावे ना 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली.03 ऑक्टोबर :- गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती 2022 सदरची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी ही उमेदवारांचे माहितीकरीता पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.https://www.gadchirolipolice.gov.in/Recruitment दिनांक 22.09.2022 रोजी पोलीस भरती 2022 ची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड प्रतिक्षा यादीवर आक्षेप घेण्यासाठी संधी देण्यात आली होती, त्यावर आक्षेप प्राप्त झाल्याने आक्षेपाची पडताळणी करण्यात आली होती. आज दिनांक 03:10:2022 रोजी उमेदवारांने घेतलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतिम / प्रतिक्षा यादीत किरकोळ बदल झाल्याने बदल करून अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतिम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत असुन यादीतील उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे निवड करण्यात आलेली आहे. मुळ कागदपत्रे पडताळणी मध्ये काही आक्षेपार्ह किंवा खोटे कागदपत्र मिळुन आल्यास उमेदवाराची निवड रद्य करण्यात येईल. प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम यादीतील उमेदवार हे पात्र आहेत असे समजुन नियुक्ती देण्यात येणार नाही.