गडचिरोली : युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

701

– जंगल परिसरात आढळला मृतदेह

लोकवृत्त न्यूज
कुरखेडा (Kurkheda) : तालुक्यातील कोसी टोला येथील २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सोमेश्वर मारोती वट्टी (२१) रा. कोसीटोला ता.कुरखेडा जि.गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोसी टोला हे २ घराची वस्ती आहे. मृतक सोमेश्वर हा ११ ऑक्टोबर रोजी घरातून निघाल मात्र उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही.कुटुंबातील व्यक्तीनी शोधाशोध केली मात्र तो कुठेही आढळून आला नाही. १२ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास काही जणांना सोमेश्वर हा जंगल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती कुरखेडा पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेन केले व मृतदेह कुटुंबातील व्यक्तीकडे सोपविन्यात आले मात्र अद्याप आत्महत्येचे कारण आद्यप कळू शकते नाही पुढिल तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत