चंद्रपूर: मच्छीमाराचा तलावात बुडून मृत्यू

0
562

लोकवृत्त न्यूज 
चंद्रपूर 1 नोव्हेंबर : सावली तालुक्यातील केरोडा तलावात आज दुपारी १ वाजता सुमारात सुकदेव बापुजी राऊत (६४) असे मुतकाचे नाव आहे

केरोडा येथील वाल्मीकी संस्थेचे सभासद असलेले सुखदेव बापुजी राऊत हे मच्छी पकडण्यासाठी केरोडा येथील तलावावर आपल्या संस्थेच्या सभासदासह गेले होते. मच्छीमारी सुरु असतानाच तलावातील मोठ्या खड्यात त्यांचा पाय गेल्याने ते पडले. सोबत असलेल्या साथीदारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाणी जास्त असल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणी करीता सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here