चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पहिल्यादाचं सात लहान मुलाचे ऑपरेशन वैद्यकीय विभागाचे अभिनंदन…

285

 

लोकवृत्त न्यूज
चिमूर ता. प्र. 18 नोव्हेंबर :- चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील सर्वरोग वैद्यकीय व दंत शिबिर दरम्यान ऑपरेशन करण्यात आले. या शिबिर संदर्भात भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई ननावरे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती मागितली. तेव्हा चिमूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमच सात लहान मुलांचे ऑपरेशन यशस्वी केल्याने शासकीय वैद्यकीय विभागाचे अभिनंदन भाजप महिला आघाडी सौ. मायाताई ननावरे यांनी केले असून यापुढे उपजिल्हा रुग्णालयात अडचणी, समस्या असल्यास आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून निराकरण करण्याची ग्वाही सौ. मायाताई ननावरे यांनी दिली.
सर्वरोग वैद्यकीय व दंत शिबिरात चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील लहान सात मुलांचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले . त्यात ज्ञानेश गजानन ननावरे वय ४ वर्ष तळोधी (नाईक), वृषभ प्रवीण रंदये ४ वर्ष चिमूर, सम्यक सुखदेव घुटके ६ वर्ष चकजांभूळविहिरा, लकी अंगत वसाके वय ६ वर्ष नवतळा, श्रद्धा नरेंद्र दडमल वय ११ वर्ष वाघेडा, क्रिष्णा परमानंद अंबादरे वय १३ वर्ष पेंढरी तालुका सिंदेवाही, गुरुदेव धनराज गुरनुले वय १५वर्ष नवेगाव तालुका सावली यांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अनुप पॉलिवाल (सर्जन), डॉ.विशाल लांजेवार (सुगणी सर्जन) सोबत वैधकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे यांनी शस्त्रक्रिया ची यशस्वी कामगिरी केली,

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन अगडे यांच्याशी भेट घेऊन सवांद साधून चर्चा करण्यात आली यावेळी सौ. मायाताई ननावरे, सौ. दुर्गा सातपुते, सौ. आशा मेश्राम, सौ. सुषमा पिंपळकर उपस्थित होत्या.