बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन…!

311

लोकवृत्त न्यूज ३० जुलै :- अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख संपर्क.७४९८३४३१९६

जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील येथे गुरुवार दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मध्यान्ह भोजन योजना बंद करून मध्यान्ह भोजन योजनेचे पैसे नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यावर वर्ग करावे, पूर्वीची समूह आरोग्य योजना चालू करण्यात यावी, नोंदीत बांधकाम कामगारांना अटल ग्रामीण योजना (घरकुल) मंजूर करावे, नोंदीत नाका बांधकाम कामगारांना निवारा, पाणी शेडची व्यवस्था करावी, 60 वर्षे पूर्ण झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांना 5 हजार रुपये मासिक पेन्शन चालू करण्यात यावी तसेच विविध शैक्षणिक 28 योजनेचा लाभ मिळावा यांसारख्या विविध मागण्यांसाठी शेवगाव-पाथर्डी तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲड.डॉ.शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील येथे भव्यजनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.