– बॉक्सींग खेळाडूंची राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२५ : नुकत्याच १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ रोजी वर्धा येथे झालेल्या शालेय विभागीय बॉक्सींग स्पर्धेत गडचिरोली जिल्हा बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंची अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये ५४ किलो वजनगटात ओम महेंद्र कुमरे सुवर्ण पदक १७ वर्षे वयोगटात मुलींमध्ये ४२ किलो वजनगटात आदिती गिरीधर बान्ते सुवर्ण पदक ५४ किलो वजनगटात भैरवी नरेंद्र भरडकर सुवर्ण पदक ७५ किलो वजनगटात नंदिनी राजकुमार आत्राम सुवर्ण पदक १९ वर्षे वयोगटात मुलींमध्ये ४६ किलो वजनगटात दिशा प्रभाकर लोनबले सुवर्ण पदक या खेळाडूनी विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे हे सर्व स्पर्धक जिल्हा बॉक्सींग प्रशिक्षण केंद्राचे नियमित खेळाडू असून यांना एन आय एस कोच पंकज मडावी, संतोश गैनवार, महेश निलेकार यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. यांच्या यशा बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी घठाळे, यशवंत कुरूडकर, बडकेलवार,जिल्हा बॉक्सींग संघटनेचे जगदिश मस्के, प्रविण मेश्राम, अनिल निकोडे, रजत देशमुख, संजय मानकर, निखिल इंगळे, सुरज खोब्रागडे व पदाधिकारी मित्र परिवारांनी अभिनंदन केले व सुभेच्छा दिल्या.

