संविधानाच्या अमृत महोत्सवात गडचिरोलीत भव्य जागृती मेळावा; ॲड. डॉ. सुरेश माने यांची प्रमुख उपस्थिती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी गडचिरोलीत संविधान जागृतीचा भव्य मेळावा होणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने 20 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता इंदिरा चौकात संविधान अधिकार सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.
या सम्मेलनाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रख्यात संविधानतज्ज्ञ ॲड. डॉ. सुरेश माने यांची उपस्थिती असणार आहे. यासोबतच अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत आणि आदिवासी समाजातील विचारवंत प्रा. अनिल होळी हे विशेष अतिथी म्हणून मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात ‘आवाज परिवर्तनाचा’ या संकल्पनेवर आधारित सुप्रसिद्ध भिमशाहीर अरुणभाऊ सहारे यांचा संगीतमय प्रबोधन कार्यक्रमही होणार आहे. सामाजिक समता, अधिकार जागृती आणि परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या ऐतिहासिक सम्मेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाविषयी जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या कांबळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Ad.Dr. Suresh Mane










