अनुकंपाधारक उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना : २९ व ३० एप्रिल रोजी दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २३ एप्रिल :- जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त पदे अनुकंपा तत्त्वावर भरली जाणार असून, त्यासाठी पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी प्रक्रिया दिनांक २९ एप्रिल व ३० एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात अंतिम ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpgadchiroli.maharashtra.gov.in तसेच कार्यालयीन फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दस्तऐवज पडताळणीसाठी पात्र असलेल्या वर्ग-३ मधील उमेदवारांपैकी अनुक्रमांक ०१ ते ११२ पर्यंतचे उमेदवार २९ एप्रिल रोजी तर अनुक्रमांक ११३ ते २१७ पर्यंतचे उमेदवार तसेच वर्ग-४ साठी पात्र ७ उमेदवार ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे मुळ कागदपत्रे व छायांकित प्रतीसह उपस्थित राहावेत.
यावेळी उमेदवारांना केवळ दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावण्यात आले असून, ही प्रक्रिया नियुक्तीची हमी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नेमणूक प्रक्रिया स्वतंत्रपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.


