कारगील चौकात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा – महिलांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण

221

कारगील चौकात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा – महिलांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- कारगील चौक येथील स्मारकावर महाराष्ट्र राज्याच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देण्यात आला, हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सौ. नलिनी सुनील देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या पुढाकाराने महिलांना समाजप्रमुख भूमिका देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, विजय साळवे, संजय गद्देवार, रुपेश सलामे, महेंद्र मसराम, वासनिक सर, सुचिता धकाते, प्रा. सुनीता साळवे, शिक्षिका वंदना वाणी, मुख्याध्यापिका मीरा मडावी, भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

गुरुदेव उच्च श्रेणी प्राथमिक शाळा व राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संचलनाने आणि राष्ट्रभक्तीपर सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष उठाव मिळाला. शिक्षक गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली संचलनाचे आयोजन झाले.

या उपक्रमातून महिलांचा सन्मान व सामाजिक सहभाग वृद्धिंगत झाल्याचे उपस्थितांनी नमूद केले.