– गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा स्तुत्य उपक्रम
लोकवृत्त न्यूज
मुरखळा (गडचिरोली), ता. १७ जुलै :- मुरखळा येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करत महिला काँग्रेसतर्फे शैक्षणिक मदतीचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात मोरे काका जी, शालिनी पेन्दाम, कविता उराडे आणि रेखा तोडसे यांचा विशेष सहभाग होता. अभ्यासासाठी आवश्यक असलेली बुक्स मोफत वाटून विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात देण्यात आला.
कार्यक्रमात शालिनी पेन्दाम म्हणाल्या, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व शैक्षणिक साधनांची गरज आहे. महिला काँग्रेस समाजोपयोगी उपक्रमातून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या पुस्तकवाटपामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळले. उपस्थित पालक व शिक्षकांनी महिला काँग्रेसच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत आभार व्यक्त केले.
( #LOKVRUTTNEWS #lokvrutt.com @lokvruttnews #gadachirolinews #Maharashtra #crime #Congress )

