नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पोळ्यालाच मुख्य चौक काळोखात ; सिग्नल सुरू पण लाईट बंद

236

नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पोळ्यालाच मुख्य चौक काळोखात ; सिग्नल सुरू पण लाईट बंद

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ :- शहराच्या इंदिरा गांधी मुख्य चौकातील हायमास्ट दिवे ऐन पोळा सणाच्या दिवशी बंद पडल्याने चौक अंधारात बुडाला. विशेष म्हणजे वाहतूक सिग्नल मात्र सुरू होते, पण चौकात पसरलेल्या काळोखामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला.
पोळ्याच्या सायंकाळी हजारो नागरिक घराबाहेर पडले होते. मात्र परतीच्या वेळी शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मुख्य चौकातच अंधार पसरल्याचे पाहून लोक संतापले. “सिग्नल सुरू पण लाईट बंद” अशी उपरोधिक टिप्पणी नागरिकांकडून होत होती.
शहरातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच गडचिरोलीला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडून केली जात आहे. परंतु मुख्य चौकात दिवेच चालू ठेवता येत नसताना स्मार्ट सिटीच्या नावाने लोकांची थट्टा केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
“ज्या शहराचा मुख्य चौकच अंधारात आहे, ते शहर स्मार्ट कसे होणार? आधी नगर परिषदेला दिवे लावता येऊ द्या!” अशा संतप्त प्रतिक्रिया पोळ्यालाच नागरिकांकडून उमटल्या.

#lokvruttnews @lokvrutt.com
#gadchirolinews #Gadchiroli #MunicipalCouncil #MainSquare #HighMastLight #TrafficSignal #PolaFestival #PublicAnger #SmartCity #गडचिरोली #नगरपरिषद #मुख्यचौक #हायमास्टलाईट #सिग्नल #पोळासण #नागरिकांचासंताप #स्मार्टसिटी