भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक ; सेवानिवृत्त शिक्षक ठार, तिघे जखमी
लोकवृत्त न्यूज
सावली : चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली शहरातील डॉ. आंबेडकर चौकात शनिवारी दुपारी ३.१० वाजता झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण धडकेत सेवानिवृत्त शिक्षक अशोक प्रल्हाद मेश्राम (६५, रा. सावली) यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या मुलासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये गौरव अशोक मेश्राम (२५, रा. सावली), तसेच ईश्वर सुधाकर बाबनवाडे (३५) आणि साहील महेंद्र बाबनवाडे (२१, दोघे रा. सिंदोळा) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदोळा येथील ईश्वर व साहील बाबनवाडे हे हिरो होंडा दुचाकी (क्र. एमएच ३४ ए के ५१६०) वरून सावलीवरून आपल्या गावी जात होते. तर अशोक मेश्राम आणि त्यांचा मुलगा गौरव हे दुसऱ्या हिरो होंडा दुचाकीवरून (क्र. एमएच ३४ यू १४२७) दवाखान्याकडे निघाले होते. डॉ. आंबेडकर चौकात समोरासमोर धडक झाल्याने अपघातात अशोक मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. सर्व जखमींना टेम्पोने ग्रामीण रुग्णालय, सावली येथे दाखल करण्यात आले. पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी शहरात तान्हा पोळा सणानिमित्त गर्दी होती. रस्ते मोकळे असल्याने वाहनांचा वेग वाढला होता. त्याचाच फटका बसून हा दुर्दैवी अपघात झाला.
मृतकाच्या पश्चात दोन मुले, विवाहित मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews #Chandrapurnews #RoadSafety #Accident #PublicWorks #Administration #Maharashtra#चंद्रपुर #सावली #अपघात #खड्डेमुक्ती #जिल्हाधिकारी #सार्वजनिकबांधकाम #महाराष्ट्र

